🟡 रत्नत्रय परिवाराच्या पुढाकारातून मांडवे येथे भव्य कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न 🟢 महिला कुस्तीला व्यासपीठ देणारा रत्नत्रय परिवार ठरला प्रेरणादायी

 🟡 रत्नत्रय परिवाराच्या पुढाकारातून मांडवे येथे भव्य कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

🟢 महिला कुस्तीला व्यासपीठ देणारा रत्नत्रय परिवार ठरला प्रेरणादायी

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 :

मांडवे (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे दिनांक १५ जुलै रोजी रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी आणि सदाशिवनगरचे विद्यमान सरपंच तथा रत्नत्रय परिवाराचे मार्गदर्शक  विरकुमार अनंतलाल दोशी यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत तब्बल ९४ रंगतदार कुस्त्या पार पडल्या. कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदान गजबजून गेले.

विशेष म्हणजे, महिलांसाठी स्वतंत्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणारा महाराष्ट्रातील अग्रणी रत्नत्रय परिवार मागील वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींना कुस्तीसारख्या पारंपरिक खेळात सहभागी होण्याची मोठी प्रेरणा मिळत असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

महिला कुस्ती स्पर्धेत सांगलीच्या कुरणे आखाड्यातील महाराष्ट्र केसरी कु. प्रतीक्षा बागडे हिने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. कु. आश्लेषा बागडे (लोणी देवकर) हिने द्वितीय, तर कु. ज्ञानेश्वरी ठवरे (खडूस) हिने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व कुस्त्या अत्यंत चुरशीच्या व प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या ठरल्या.

याचबरोबर रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवेच्या विद्यार्थिनींनीही उल्लेखनीय यश संपादन केले. कु. प्रतीक्षा रामभाऊ गोफणे (मांडवे), कु. सिया उदय धाहिंजे (सदाशिवनगर) आणि कु. संस्कृती महेश करचे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने विजय मिळवत शाळेचा गौरव वाढविला.

 ईशा कोलटकर, ईश्वरी ठवरे, सायली गाढवे यांनीही या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेस ताराराणी प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा सौ. शीतलदेवी मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवर रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "ग्रामीण भागातील मुलींना कुस्तीचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे धाडसी आणि स्तुत्य कार्य आज रत्नत्रय परिवार करत आहे. हा उपक्रम निश्चितच महिला कुस्तीला नवी दिशा देणारा आणि अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे."

 या स्पर्धेसाठी डॉ. रावसाहेब पाटील , संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी, सदाशिवनगर चे सरपंच विरकुमार दोशी,

 डॉ. सतीश दोशी, व डॉ. सुनेत्रा दोशी,  दत्ता मगर, श्री सन्मती सेवा दल संस्थापक मिहिर गांधी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद दोशी, उपाध्यक्ष विशाल गांधी,  महावीर शहा, आनंद शेडगे, रोनक चंकेश्वरा, अमित गांधी, वैभव शहा, रत्नत्रय पतसंस्थेचे  चेअरमन विरकुमार दोशी व संचालक प्रमोद दोशी, रामभाऊ गोफने यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच या कार्यक्रमासाठी सुरेश धाईजे, ज्ञानेश राऊत,  चंद्रकांत तोरणे, उदय धाईजे,  वैभव मोडासे, स्वप्निल राऊत, हरी पालवे, देविदास ढोपे, संतोष शिंदे, डॉ. मकरंद पालवे, प्रताप झंजे, काका काळे, बापू ठवरे व पंच म्हणून नवनाथ कुंभार, नारायण माने, सुहास तरंगे, सचिन माने, संदीप बोराटे विठ्ठला अर्जुन  प्रवीण सरगर, अभिजीत खुडे,  यांनी पंच म्हणून पारदर्शक काम पार पाडले. या कार्यक्रमाचे  समालोचक धनाजी मदने  व युवराज केचे  यांनी पाहिले.

 किरण मोरे, सतपाल सिंह, बापू कोळेकर, चंदनशिवे, सूर्यकांत पुणदेकर, पुनदी  अमोल पवार कडेगाव, सचिन शिंदे बेड, संदीप शेंडगे वाखरी, महादेव झोळ वाशिंबे, कौशल्य वाघ रायगाव हे सर्व वस्ताद आपापल्या कुस्तीपटू मुलींना घेऊन उपस्थित होते. तसेच रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज मांडवे. दहिगाव माळशिरस नातेपुते या सर्व शाखेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रत्नत्रय परिवाराच्या या सामाजिक व क्रीडाविषयक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देणारा हा आदर्श उपक्रम भविष्यातही अशाच जोमाने सुरू राहावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या