रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवचैतन्य वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/02/2026 : रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. इयत्ता अकरावीच्या मुलींच्या स्वागत गीता नंतर प्रतिमा पूजन झाले. उपस्थित मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थी यांचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केतन महेंद्र शहा होते.
रंगमंचाचे उद्घाटन रमेश रूपचंद शहा (संस्थापक, मधुर मिलन ट्रस्ट पुणे)यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, रवींद्र हिरालाल गांधी (विभाग अध्यक्ष भारतीय जैन संघटना मराठवाडा विभाग ), किरणकुमार जयकुमार शहा (फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज अध्यक्ष महाराष्ट्र ) व सौ मीनल मिलिंद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष केतनभाई शहा ( अध्यक्ष भारतीय जैन संघटना ) यांनी रत्नत्रय ग्रामीण भागात असूनही प्रगतीपथावर आहे. येथील शिक्षक स्टाफ तज्ञ व अनुभवी आहे तसेच तसेच मन लावून काम करतो. जैन समाज कोणतेही जात-पात न पाहता क्षेत्र ही कोणतेही असू दे मन लावून काम करतो. या शाळेत शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करावा. संस्थेसाठी सहकार्य करण्याची माझी तयारी आहे असे प्रतिपादन शहा यांनी केले. तसेच रमेश शहा यांनी स्नेहसंमेलन म्हणजे जमलेल्या लहानापासून मोठ्यापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये स्नेहभाव आदरभाव निर्माण व्हावा आपुलकी निर्माण व्हावी आपण काय करू शकतो हे एकमेकाला दाखवणे म्हणजे स्नेहसंमेलन. या कार्यक्रमासाठी छान तयारी करून घेतलेल्या सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले तसेच संस्थेचे सचिव प्रमोद दोशी यांनी मुलांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाबरोबर संस्था कोणते उपक्रम राबवत आहे व भविष्यात कोणते उपक्रम राबवणार आहे याचा आढावा घेतला. चालू वर्षीपासून आम्ही पाचवी ते दहावी फाउंडेशन कोर्स सुरू करणार आहोत. आमच्या शाळेतील विद्यार्थी हा भविष्यातील भारताचा उज्वल नागरिक व भारताचा कणा बनणार आहे यात काही शंकाच नाही. तसेच इयत्ता पहिली सीबीएसई ची विद्यार्थिनी जिजाऊ देशपांडे यांचे पालक देशपांडे यांनी शाळेचा आलेला अनुभव सांगितला त्या म्हणाल्या की रत्नत्रय शाळेमध्ये इंग्रजी शिक्षणाबरोबर सांस्कृतिक सण, उत्सव सर्व साजरे केले जातात तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे ग्राउंड उपलब्ध आहे. येथील स्टाफ देखील तज्ञ आहे म्हणून मी या शाळेची निवड माझ्या मुलीसाठी केली आहे व शाळेचे कौतुक केले.तसेच इयत्ता पाचवी इंग्लिश मीडियम ची विद्यार्थिनी वसुंधरा पाटील तिचे पालक पाटील यांनी संस्थेची स्तुती करताना अनंतलाल दोशी यांनी 2008 मध्ये लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होताना आपल्याला दिसत आहे तसेच दादांचे दोन पुत्र वाघासारखे आहेत दादांचे संपूर्ण कुटुंब या संस्थेसाठी झटत आहे. रत्नत्रय शाळेचे वातावरण शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे म्हणून मी या शाळेची निवड माझ्या मुली करता केली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच इयत्ता नर्सरी चा विद्यार्थी विहान माने यांचे पालक माने यांनी सांगितले की रत्नत्रय शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची अतिशय काळजी घेतात दर्जेदार शिक्षण देतात मुलांना सपोर्ट करतात म्हणून रत्नत्रय शाळेविषयी गौरव उद्गार त्यांनी काढले. नवचैतन्य कार्यक्रमात आलेल्या सर्व पाहुण्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
नंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, मार्गदर्शक वीरकुमार दोशी, सचिव प्रमोद दोशी खजिनदार मिहीरभाई गांधी उपाध्यक्ष विशाल गांधी, निश्चल व्होरा, वैभव शहा, अमित गांधी, रोनक चंकेश्वरा, सुरेश धाईजे, बाहुबली दोशी, वसंत ढगे, रामदास करणे, बबन गोफने, अभिजीत दोभाडा, अभिजीत दोशी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम रंगमंचावर सादर केला. यामध्ये हिंदी, मराठी चित्रपट, नाटक, नारीशक्ती लावणी, देशभक्तीपर गीत, खंडोबा, गणपती गीत अशा अनेक प्रकारच्या गाण्यांवर सुंदर नृत्य करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकूण 33 गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देसाई, सूत्रसंचालन अमृता मोहिते व गळवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वीरकुमार दोशी यांनी केले.




0 टिप्पण्या