शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना उद्या अन्नदान

 


शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना उद्या अन्नदान

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 :

 शिक्षण प्रसारक मंडळाचे  मार्गदर्शक  संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली   शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वैष्णवांना अन्नदान करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ जूलै २०२६ रोजी दुपारी ठीक ३-४५ वाजता अकलूज सराटी महामार्गावर अकलूज हद्दीत भाकरी, पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असे अस्सल ग्रामीण अन्नदानाचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या