कांबळे 卐 ताडे शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/07/2026 :
कै. निलेश (आण्णा) सुभाष कांबळे राहणार अकलूज तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या चि. सौ. कां. शिवानी आणि श्री सतीश शिवाजी ताडे राहणार मिरज, जिल्हा सांगली यांचे द्वितीय चिरंजीव ॲड.व्यंकटेश यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वा. 43 मिनिट या गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटाने संपन्न झाला. कृष्णप्रिया मल्टी फंक्शनल हॉल बायपास रोड, संग्रामनगर, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले.
याप्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक तथा सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, मुख्याध्यापक सुभाष लवटे, संतोष राजगे, सामाजिक कार्यकर्त्या बिस्मिल्ला मोरवे व सोनाली मोरे, निलेश जालींदर पगारे हे देखील उपस्थित होते.
या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे कांबळे आणि ताडे परिवाराच्यावतीने स्वागत सन्मान करण्यात आला.

0 टिप्पण्या