वयाकडून क्षण चोरायला शिका
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/11/2026 :
वयाकडून क्षण चोरायला शिका,कारण काळाच्या ओघात निघून गेलेली वेळ आणि जगून गेलेले क्षण आयुष्यात पुन्हा कधीच परत येत नाहीत.माणूस आयुष्यभर पैसा,प्रतिष्ठा आणि यश मिळवण्याच्या धावपळीत इतका गुंतून जातो की,स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी जगायचंच विसरून जातो.उद्याच्या सुखासाठी आजचा आनंद गमावतो आणि भविष्याची चिंता करताना वर्तमानातील सुंदर क्षण हातातून निसटून जातात.आयुष्य किती वर्षांचं आहे,यापेक्षा ते किती आनंदाने,प्रेमाने आणि समाधानाने जगलो,हे अधिक महत्त्वाचं आहे.कुटुंबासोबत घालवलेला वेळ,मित्रांसोबत केलेल्या गप्पा,निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवलेली शांतता,गरजूंच्या चेहऱ्यावर फुलवलेलं हास्य आणि मनापासून केलेली समाजसेवा हेच जीवनातील खरे आनंदाचे ठेवे आहेत.लक्षात ठेवा,वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही,पण त्या वेळेत निर्माण केलेल्या सुंदर आठवणी आयुष्यभर मनाला आनंद देतात.म्हणून जबाबदाऱ्या नक्की पार पाडा,कष्टही करा,पण या सगळ्यात स्वतःचं जगणं विसरू नका.आपल्या माणसांना वेळ द्या,मनसोक्त हसा,आवडत्या गोष्टी करा आणि शक्य असेल तिथे दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत राहा.कारण शेवटी आयुष्याच्या हिशोबात आपण किती कमावलं,यापेक्षा आपण किती सुंदर क्षण जगलो आणि किती माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं,हेच अधिक मोलाचं ठरतं!वय वाढतं,काळ सरतो आणि आयुष्य संपत जातं,म्हणून जगणं उद्यावर ढकलू नका.आजचा दिवस आनंदाने जगा,माणसं जपा आणि प्रत्येक क्षणाला सुंदर आठवण बनवा.म्हणूनच *वयाकडून क्षण चोरायला शिका कारण विशिष्ट काळानुसार वेळ माणसाला जगलेले क्षण परत देत नाही.
"मित्रांनो;काळजी घ्या. ..."

0 टिप्पण्या