गोवा येथील आयर्न मॅन स्पर्धेत पोलीस धनाजी झगडे यांची कौतुकास्पद कामगिरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/11/2026 : गोवा येथे संपन्न झालेल्या "आयर्न मॅन 2026" स्पर्धेमध्ये माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस धनाजी झगडे यांनी आयर्न मॅन या स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.
२ किलोमीटर स्विमिंग, 21 किलोमीटर रनिंग, 90 किलोमीटर सायकलिंग अशी स्पर्धा होती. ही स्पर्धा ६ तास 57 मिनिटात पूर्ण करून त्यांनी यश संपादन केले त्याबद्दल जी.एस. स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे तसेच मॉर्निंग ग्रुप, समरजीत सिंग कॅरियर अकॅडमी, बॅडमिंटन ग्रुप, 45 रन ग्रुप इत्यादी सर्व सर्व ग्रुपने त्यांचे स्वागत, सन्मान करून कौतुक आणि हार्दिक अभिनंदन केले.


0 टिप्पण्या