मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/11/2026 :
जीवनात अगदी लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टींची ओढ असते, आपण त्यांच्या मोहात पडतो. त्याचप्रकारे काही व्यक्तीही आपल्याला खूप आवडतात, त्यांच्या सहवासात राहायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला आकर्षित करते.
जसजसे आपण मोठे होत जातो, आवडी-निवडी कळू लागतात, तसे चांगले कपडे, दागिने, पैसा, गाडी, मोबाईल अशा भौतिक गोष्टींबद्दल आपली आसक्ती वाढते. त्या मिळवण्यासाठी आपण जीवाचा आटापिटा करतो.
खरे तर आसक्ती असावी, पण ती सकारात्मक दृष्टिकोनातून असावी. सत्कर्मे करण्यासाठी, चांगल्या सवयींसाठी आणि देशप्रेमासाठी जर आपण आसक्त असलो, तर ते आपले व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने घडवते.
आजचा संकल्प
भौतिक गोष्टींतील वैयक्तिक मोह किंवा लोभ यांसाठी आसक्त होण्यापेक्षा, एखाद्या सकारात्मक व बहुपयोगी उद्देशाने आसक्ती वाढवू आणि स्वतःबरोबर इतरांनाही आनंदी करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या