मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/11/2026 :
दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा काही कार्यक्रमांना किंवा समारंभांना जाण्याचा योग येतो. तिथे आपल्याला अनेक जण भेटतात. 'अमुक दिसला, तमुक दिसला नाही' अशी आपली चर्चा होते. 'हा होता, तो होता' अशीही आपण नोंद करतो.
खरे तर, तिथे केवळ कोणी दिसणे किंवा असणे ही त्यांची फक्त शारीरिक उपस्थिती झाली. तिथे मनाने व मनापासून किती जण असतात? आपण तरी प्रत्येक ठिकाणी खऱ्या अर्थाने मनाने उपस्थित असतो का?
शाळेत, कार्यालयात किंवा इतर ठिकाणी आपण जितक्या दिवसांची हजेरी लावतो आणि जितका वेळ त्या ठिकाणी असतो, तो प्रत्येक क्षण आपण त्याच कार्यासाठी वापरला पाहिजे. शरीराइतकीच आपली मनाची उपस्थितीही तेथे अत्यंत महत्त्वाची असते.
आजचा संकल्प
एखाद्या ठिकाणी आपण ज्या कामासाठी जातो, त्याच कामासाठी आपण तिथला आपला प्रत्येक क्षण वापरू आणि त्या कामासाठी अत्यंत प्रामाणिकपणे वेळ देऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या