कर्म आणि फळ

 

कर्म आणि फळ 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/11/2026 :

मनुष्याला आयुष्यात वागताना,बोलताना आणि निर्णय घेताना मनमानी करण्याचे स्वातंत्र्य असते. कोणाशी कसे वागायचे,कोणाला मदत करायची,कोणाचा विश्वास जपायचा किंवा कोणाला दुःख द्यायचे,हे सर्वस्वी त्याच्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून असते.मात्र,आपण केलेल्या प्रत्येक कर्माचे परिणाम स्वीकारण्याची वेळ येते, तेव्हा मनुष्याला मनमानी करता येत नाही.कारण काळाच्या न्यायालयात पद,पैसा,प्रतिष्ठा किंवा दिखावा चालत नाही,तिथे फक्त कर्माची साक्ष महत्त्वाची असते.दुसऱ्यांच्या भावनांशी खेळून,कुणाचा विश्वासघात करून,स्वार्थासाठी माणसांचा वापर करून काही काळ यश मिळाल्यासारखे वाटू शकते,पण ते यश कायमस्वरूपी नसते.त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे केलेली मदत,निःस्वार्थी सेवा,जपलेली नाती आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात निर्माण केलेला आनंद यांचेही सकारात्मक परिणाम आयुष्यात नक्कीच उमटतात.म्हणूनच आयुष्यात कोणाशीही वागताना आपल्या शब्दांचा आणि कृतींचा विचार केला पाहिजे.कारण एखाद्याला दिलेले दुःख विसरले जाऊ शकते,एखाद्यावर केलेला अन्याय काही काळ झाकला जाऊ शकतो,पण आपल्या कृतींचे परिणाम टाळता येत नाहीत.लक्षात ठेवा,दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःचे आयुष्य सुंदर बनवता येत नाही.माणसाने इतकेच करावे की,आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा आणि आपल्या कर्माचा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ नये.शेवटी एकच सत्य;कर्म करताना माणूस स्वतःच्या इच्छेचा मालक असतो,पण त्या कर्माचे परिणाम स्वीकारताना तो नियतीच्या न्यायापुढे असतो.म्हणून वाईट करण्याची संधी मिळाली म्हणून वाईट करू नका आणि चांगले करण्याची संधी मिळाली तर ती कधीही सोडू नका.कारण *माणसाची खरी ओळख त्याच्या बोलण्यातून नाही,तर त्याच्या कर्मातून निर्माण होते.

"मित्रांनो;काळजी घ्या. ..."

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या