🟣हर्षदा जाधव देशमुख यांचा दणदणीत विजय 🔵 मतदार संघात 58 पैकी 47 आमदार तरीही! "टांगा पालटी घोडा फरार"!

 

🟣हर्षदा जाधव देशमुख  यांचा दणदणीत विजय

🔵 मतदार संघात 58 पैकी 47 आमदार तरीही! "टांगा पालटी घोडा फरार"! 

वृत्त एकसत्ता न्यूज

पुणे /अकलूज ता.28: पुणे पदवीधर मतदाररसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती. सोबतच ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या बड्या नेत्यांनीही जोर लावला होता. परंतु या जागेवरून भाजपाच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवर हर्षदा जाधव देशमुख यांचा तब्बल 9700 मतांनी विजय झालाय.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार  स्मिता जाधव पराभूत झाल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासनूच स्मिता जाधव आणि हर्षदा जाधव देशमुख यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. परंतु नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव देशमुख यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. या निवडणुकीत हर्षदा जाधव यांना 1 लाख 13 हजार 95 मतं मिळाली. त्यांना स्मिता जाधव यांच्यापेक्षा 9700 मतं जास्त मिळाली.

*मतदासंघात 58 आमदार.*

58 पैकी 44 सत्ताधारी युतीचे.

 3 विधान परिषदचे, पैकी 2 BJP, 1 मित्रपक्षाचा.

58 पैकी 47 आमदार तरीही! "टांगा पालटी घोडा फरार"!

" अब्रु गेली म्हणुन निकाल ऊशीरा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या