विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/11/2026 :
मित्रपरिवारात वावरताना जशा गप्पाटप्पा होतात, तसे कधी कधी 'तुझे-माझे'ही होते. वाद कधी थोडक्यात मिटतात, तर कधी ते विकोपाला जातात. अगदी एकमेकांचे तोंड न पाहण्याचे ठरवून मित्र एकमेकांपासून दुरावतात.
पण आपण इतकी टोकाची भूमिका कधीच घ्यायची नाही. वादाच्या वेळी कोणीतरी एकाने दोन पावले माघार घेतली, तर मैत्री नक्की टिकते. रागाची ती वेळ निघून गेली, की वातावरण पुन्हा शांत होते.
मुलांनो, कोणतीच गोष्ट विनाकारण जास्त ताणायची नसते. जेव्हा वाद होतात, तेव्हा तर आपली भाषा फार जपून वापरायची असते; कारण ज्या शब्दांनी मैत्री जोडलेली असते, तेच शब्द मैत्री तोडण्यासही कारणीभूत ठरतात.
कोणतीही गोष्ट तोडण्यापेक्षा ती जोडण्यासाठी जास्त मेहनत लागते; त्यामुळे ती जपणे नेहमी महत्त्वाचे असते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या