मनाचा थांगपत्ता

 मनाचा थांगपत्ता

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 6/11/2026 :

मनाच्या आभाळाचा लागत नाही थांगपत्ता आपल्याच आपल्याला!

मन आता इथे, तर क्षणात तिथे. कधी काय मनात येईल आणि जाईल, हे आपलं आपल्यालाच समजत नाही.

विशाल मन?

कधी होतं छोटं, तर कधी होतं विशाल आकाशाएवढं मोठं! क्षणात आनंदी, तर क्षणात दुःखी, उदास. मनाचं गणित कधी कुणाला समजलं!

मनाचं कोडं?

अंतर्मनात एक, तर बाह्यमनात एक. सर्वांचंच चालू असतं असंच काहीसं.

अंतर्मन आणि बाह्यमन, मनाचे प्रकार दोन की अनेक? अंतर्मनाला बाह्यमनाचं आणि बाह्यमनाला अंतर्मनाचं कधी समजतं का काही?

लपाछपीचा खेळ...

कितीही सांगा कुणी, आपलं मन सांगतं तेव्हाच आपण ऐकतो. हे बघा, आपल्याच आपल्याला विचारून!

उमगतं का काही?

मनावर जो ताबा ठेवू शकतो, तोच महान बनतो, असं ऐकलं आहे; पण अनुभवलं मात्र नाही.

वरवर कितीही ताबा ठेवला, तरी अंतर्मन अडकतं एखाद्या गोष्टीत, हा माझा-तुमचा अनुभव आहे.

पण मन मात्र आहे गगनापेक्षाही मोठं आणि प्रकाशापेक्षाही फास्ट!

कधीच कोणाला कोणाचं मन ओळखता आलं नाही. आपल्याच आपल्याला आपलं मन ओळखता येत नाही. कधी कधी...

म्हणूनच बहिणाबाई चौधरींची कविता इथे आठवते मला.

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ॥

मनाला बहिणाबाईंनी अनेक उपमा दिल्या आहेत. वढाय, उभ्या पिकातलं ढोर, मन मोकाट, मन लहरी, मन जहरी...

मनाचा थांगपत्ता Al ला सुद्धा लागत नाही .

Al सारख्या प्रगत तंत्रज्ञानही मनापुढे हतबल आहे .

मौन पाळलं जातं खरं, पण मन मात्र आतल्या आत बोलत असतं.

मन असंच आहे! माझं-तुमचं सारखंच!

मनावर कितीही बोललं, तरी कमीच आहे.

✍️©️सौ.धनश्री म्हेत्रस 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या