विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/11/2026 :
दिवाळी साजरी करताना आपण आकाशदिवे लावतो; पणत्या लावून वातावरण प्रकाशित आणि मंगलमय करतो. पहाटेचे अभ्यंगस्नान आणि घरात बनवलेले फराळाचे पदार्थ म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद!
या सर्वांत आणखी दोन महत्त्वाच्या, पण परस्परविरोधी गोष्टी असतात; त्या म्हणजे अंगणात बनवलेला किल्ला आणि फटाके! किल्ला बनवताना आपण एक निर्मिती करत असतो. त्यामध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर करतो.
मुलांनो, याच्या नेमके उलट 'फटाके उडवणे किंवा फोडणे' हा प्रकार आहे. यात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते, जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. छोटे-मोठे अपघात होतात, क्वचित प्रसंगी आग लागण्यासही हे कारणीभूत ठरतात. शिवाय यात पैशाचा मोठा अपव्ययही होतो.
आनंद कशाचा घ्यायचा, निर्मितीचा की विध्वंसाचा? हे तुमचे तुम्हीच ठरवा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या