विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/11/2026 :
दिवाळीचा सण म्हटले की आपण सगळे एकत्र असतो. जमले तर पाहुण्यांनाही बोलावतो. आपण मामाच्या गावी जातो किंवा आत्या व तिच्या मुलांना आपल्याकडे बोलावतो. थोडक्यात काय, तर दिवाळी आपण सर्व जण मिळूनमिसळून साजरी करतो.
आपल्या शाळेला दिवाळीची सुट्टी असते. आई-बाबांच्या ऑफिसलाही सुट्टी असते. मात्र देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जे शूर भारतीय जवान सीमेवर खडा पहारा देत आहेत, त्यांना सुट्टी नसते.
अशा वीर जवानांच्या पत्नी व मुले किंवा आई-वडील आपल्या आसपास राहत असतील, तर त्यांच्या घरी फराळ घेऊन जा किंवा त्यांना आपल्या घरी फराळाला बोलवा. त्यांना एकटे वाटणार नाही, याची आपण सर्व जण काळजी घेऊ.
आपल्या जवान बंधूंना आपण आश्वस्त करूया, "तुम्ही तिकडे सीमेवर निर्धास्त राहा, तुमच्या कुटुंबाची काळजी आम्ही घेऊ!"
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या