'कर्मयोगी सु.रा.परिचारक मल्टी स्टेट'च्या उपाध्यक्षपदी बाबासाहेब क्षीरसागर यांची निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/11/2026 :
सहकार क्षेत्रात अग्रगण्य आणि अत्यंत विश्वासू संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पंढरपूर येथील कर्मयोगी सु.रा.परिचारक मल्टी स्टेट को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या उपाध्यक्षपदी सर्वांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर यांची निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रासह संपूर्ण पंढरपूर, मोहोळ तालुक्यातून आणि सभासदांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या अग्रगण्य मल्टी स्टेट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच प्रक्रियाबद्ध पद्धतीने पार पडली. संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ व हितचिंतकांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत उपाध्यक्षपदासाठी बाबासाहेब क्षीरसागर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्यांचे सामाजिक व सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, त्यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संस्थेच्या प्रगतीला मिळणार नवी गती
बाबासाहेब क्षीरसागर हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रभागी राहिले आहेत. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कारभाराला अधिक शिस्त, पारदर्शकता आणि नवी दिशा मिळेल, असा विश्वास नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि सभासदांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांत विस्तार असलेल्या या संस्थेचा आलेख तात्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक उंचावेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेब क्षीरसागर यांची निवड म्हणजे त्यांच्या निस्पृह सेवेचा आणि नेतृत्वाचा गौरव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या प्रत्येक घटकाला आणि सभासदांना नक्कीच होईल," अशा शब्दांत समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

0 टिप्पण्या