सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूटच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाला DBATU झोनल स्पर्धेत अभिमानास्पद यश

 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूटच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाला DBATU झोनल स्पर्धेत अभिमानास्पद यश 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 6/10/2026 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा  दिनांक दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी एम डी ए स्कूल ऑफ फार्मसी, कोळपा, लातूर येथे पार पडल्या या स्पर्धेत सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज येथील विद्यार्थीनिनी व्हॉलीबॉल खेळामध्ये तिसरा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रवीण ढवळे यांनी दिली. 

विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव सुहास यादव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले सदरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून क्रिडा शिक्षक प्रा. विकास शिवशरण यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या