शंकरराव मोहिते महाविद्यालयात कार्यप्रसिद्धी सप्ताहाचे यशस्वी आयोजन

 

शंकरराव मोहिते महाविद्यालयात  कार्यप्रसिद्धी सप्ताहाचे यशस्वी आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 2/10/2026 :

येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यप्रसिद्धी सप्ताहाचे आयोजन केले होते .या सप्ताहाअंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे यांनी विद्यार्थ्यांना उदबोधन केले. त्यानंतर महाविद्यालयात निबंध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, पोस्टर स्पर्धा, व्यसनमुक्ती जनजागृती, सर्प विज्ञान कार्यशाळा, प्लास्टिक निर्मूलन व परिसर स्वच्छता अभियान, वृक्षदिंडी व वृक्षारोपण ,रांगोळी स्पर्धा आदींचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त या सप्ताहाचा समारोप महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये समारंभ संपन्न झाला. या समारंभ निमित्त अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व निर्भया पथकाचे संचालक  समाधान देशमुख हे उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी, "विद्यार्थ्यांना जीवनाचे ऊच्च ध्येय बाळगून ते साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध परिश्रम करण्याचे आवाहन केले."

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी सर्व ऊपक्रमात उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर डॉ.बाळासाहेब मुळीक, डॉ.जनार्दन परकाळे, डॉ.रवींद्र माने,प्रा.स्मिता पाटील, प्रा.नंदुरबार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

   राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.

यावेळी विविध स्पर्धांमध्ये सुयश संपादन केलेल्या स्पर्धकांना सन्मानीत करण्यात आले.

 डॉ.विजयकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले  तर डॉ.सज्जन पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या