सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पालक-शिक्षक सभा संपन्न

 


सहकार महर्षि  अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पालक-शिक्षक सभा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/10/2026 :

अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील मेकॅनिकल  पदवीका इंजीनियरिंग  विभागामध्ये महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा  कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 03/10/2026 रोजी पालक-शिक्षक सभा झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी दिली. 

 प्रा. अग्रवाल जी.बी  यांनी  उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली व सभेचा उद्देश सर्व पालकांसमोर मांडला.

 मेकॅनिकल  विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रविकांत देशमुख  यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व प्राध्यापक सदस्यांची पालकांशी ओळख करून देत  विभागामध्ये वर्षभर चालणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील तसेच शैक्षणिक व्यतिरिक्त उपक्रमाबद्दलची माहिती पालकांना सांगितली. त्यांनी पदवीका द्वितीय व तृतीय  वर्षाच्या अभ्यासक्रमाची माहिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अंतर्गत मूल्यमापन पद्धती तसेच शिस्तीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही सांगितले.  पालक सभेचे मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात त्यांनी तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास, करिअरच्या संधी आणि शैक्षणिक गुणवत्ता यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी नियमितपणे महाविद्यालयाशी संपर्क ठेवावा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सभेदरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व शिस्तीबाबत विविध प्रश्न विचारले. संबंधित प्राध्यापकांनी समाधानकारक उत्तरे देऊन शंका निरसन केले. त्यामुळे पालकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली.शेवटी प्रा. मनोज मगर  यांनी सर्व पालकांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या