पिंपरी बुद्रुक येथे केळी पीक प्रात्यक्षिक पाहणी, पीक परिसंवाद व चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
इंदापूर तालुका प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक दिनांक 7/10/2026 :
नेक्सा स्पेशालिटी फर्टिलायझर, नाशिक यांच्या वतीने पिंपरी बुद्रुक (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथे केळी पीक प्रात्यक्षिक पाहणी, पीक परिसंवाद व चर्चासत्र कार्यक्रम मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. "या कार्यक्रमाच्या माध्यमातून कंपनी थेट पिकांच्या सानिध्यात असल्याचे कृतीतून दिसून आले" असे मत सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संस्थापक संपादक, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता) यांनी कंपनी प्रतिनिधीं बरोबर बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक माऊली कृषी उद्योग, अकलूजचे प्रोप्रायटर प्रसाद ज्ञानदेव खरात आणि राहुल हनुमंत गारुळे, सेल्स एक्झिक्युटिव्ह, माळशिरस होते. प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी श्रीमंत अंकुश पडळकर यांच्या शेतावर पाहण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी ऊसभूषण हनुमंत अंकुश पडळकर उपस्थित होते.
कार्यक्रमात नितीन सुरेश कदम, एरिया मार्केटिंग मॅनेजर, पश्चिम महाराष्ट्र यांनी केळी लागवड, रोपांची निवड व व्यवस्थापन आणि चांगल्या प्रतीच्या रोपांची वैशिष्ट्ये याबाबत मार्गदर्शन केले. दिनेश पंडित भोसले, एरिया सेल्स मॅनेजर,सोलापूर–धाराशिव विभाग यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणती खते एकत्र मिसळावीत, याविषयी माहिती दिली.
केळी पिकाच्या सुरुवातीच्या जोमदार वाढीसाठी २८:२८:०० आणि १४:४८:०० या ग्रेडच्या वापराची माहिती देण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यातील चांगली वाढ पुढील घडनिर्मितीसाठी उपयुक्त ठरते, असे सांगण्यात आले. त्यानंतर बुंध्याची अपेक्षित वाढ होण्यासाठी एक्सलर एकरी १ लिटर, तसेच ००:४८:४७ आणि ००:४२:४७ या ग्रेडच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
केळी पिकाची वेन एकसमान होण्यासाठी आणि दांडा मजबूत होण्यासाठी नेक्सा ०५:५५:१५ या ग्रेडच्या वापराबाबत माहिती सांगण्यात आली. तसेच झाडांमध्ये नैसर्गिक संप्रेरकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी, केळी पीक ताणमुक्त ठेवण्यासाठी आणि अपेक्षित घडाचे वजन व उत्पादन मिळवण्यासाठी किट-कॅट, नेक्स्टर आणि अल्बर्ट या उत्पादनांच्या वापराबाबत माहिती देण्यात आली.
सोडियम व क्लोरीनमुक्त उत्पादनांचा शेती आणि पिकांसाठी होणारा उपयोग, तसेच अशा उत्पादनांची निवड का महत्त्वाची आहे, याबाबतही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. सागर अरविंद शिंगटे, रीजनल सेल्स मॅनेजर, पश्चिम महाराष्ट्र आणि सागर अशोक सातभाई, टेरिटरी सेल्स मॅनेजर, सोलापूर यांनी कंपनीची उत्पादने व तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
चर्चासत्रात शेतकऱ्यांनी केळी पिकातील विविध अडचणी मांडल्या. त्यावर चर्चा करून उपस्थितांनी मार्गदर्शन केले. योग्य खतांची निवड आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनातून केळी पिकाची वाढ व गुणवत्ता सुधारण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
0 टिप्पण्या