विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/10/2026 :
आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्ती, शाळेतील आपले वर्गमित्र, आपले नातलग आणि परिचित अशा अनेक लोकांच्या सहवासात आपण नित्यनियमाने येत असतो; त्यांच्या चांगल्या-वाईट सवयी आपण दैनंदिन व्यवहारात जवळून अनुभवत असतो.
'व्यक्ती तितक्या प्रकृती' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव आणि सवयी वेगवेगळ्या असतात. त्या सगळ्याच सवयी चांगल्या असतात असे नाही; मात्र आपल्याकडे वय आणि अनुभवाची पुरेशी परिपक्वता नसल्यामुळे आपण बऱ्याचदा नकळत त्यांच्या चुकीच्या सवयींचे अनुकरण करू लागतो, हे वेळीच टाळले पाहिजे.
मुलांनो, मनात नेहमी सकारात्मक आणि विवेकी विचार ठेवले, तर काय योग्य आणि काय अयोग्य हे तुम्हाला सहज उमगेल. सर्व प्रकारच्या अयोग्य गोष्टींपासून चार हात दूर राहा. खोटे बोलणे पूर्णपणे टाळा; स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाशीही मैत्री करू नका आणि कोणाच्या दुःखात अथवा अपयशात कधीही विकृत आनंद मानू नका.
स्वतःवर कधी कठीण प्रसंग किंवा संकट ओढवलेच, तर शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घ्या आणि त्यातून हिमतीने बाहेर पडा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या