🔰 रत्नत्रय पतसंस्थेची 22 वी वार्षिक सभा खेळीमेळीत
🔵 रत्नत्रय पतसंस्था देणार सभासदांना 15 टक्के लाभांश : अनंतलाल दोशी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
सदाशिवनगर : रत्नत्रय पतसंस्थेची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू असून चालू वर्षी संस्थेने सभासदांना या वर्षी सभासदांना 15% लाभांश देण्यात येणार असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक आनंतलाल रतनचंद दोशी यांनी संस्थेच्या 22 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते यावेळी संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, व्हा. चेअरमन डॉ. निवास गांधी, संचालक , प्रमोद दोशी,अजय गांधी, रामदास गोफणे,जगदीश राजमाने, सोमनाथ राऊत, विलास साळुंखे , सौ.अनिता दोशी,सौ अनघा गांधी व सचिव ज्ञानेश राऊत यांचे सह सर्व सभासद उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित (दादा) पवार,श्रीपाद ढेकणे साहेब व इतर सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व संस्थेचे हितचिंतक दिवंगत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली त्या नंतर सभासदांच्या हस्ते भगवान महावीरांच्या व तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद अनंतलाल दोशी यांनी केले ते म्हणाले पतसंस्थेची स्थापना 2004 झाली असून परिसरातील छोटे व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्याची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आली असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद ठेवेदार संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे आर्थिक व्यवहाराबरोबरच ही संस्था अनेक सामाजिक कार्य ही करत आहे.
संस्थेमार्फत सभासदांसाठी भारतात कुठेही आरटीजीएस व एनएफटी ची सोय करण्यात आलेले आहे डी डी काढण्याची सॊय लाईट बिल भरण्याची सेय क्यू आर कोड पेमेंट सॊय , पिग्मी व आर डी तसेच लखपती मासिक ठेव अशा विविध सेवा चालू केलेले आहेत तसेच सर्व कर्जदारांची पिग्मी ची रक्कम दर महिना अखेर ला कर्ज खात्यामध्ये जमा करण्याची सॊय अशा विविध सेवा संस्थेमार्फत सभासदांना देण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.
वार्षिक सभेचा अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन मा.श्री. विरकुमार दोशी यांनी केले त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदांनदाखवला 31 मार्च 2026 अखेर संस्थेकडे 24 कोटी 56 लाख रुपयांच्या ठेवी असून कर्जवाटप 18 कोटी 73 लाख रुपये आहे तसेच संस्थेचे गुंतवणूक 13 कोटी 49 लाख रुपये इतकी आहे संस्थेचे एकूण वसूल भांडवल 49 लाख 67 हजार रुपये इतके आहे तसेच संस्थेचे एकूण उत्पन्न 2 कोटी 72 लाख रुपये असून खर्च 2 कोटी 35 लाख रुपये झाला असून वार्षिक उलाढाल 155 कोटी 97 लाखा रु इतकी आहे संस्थेला चालू वर्षी 35 लाख 20 हजार रुपये नफा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले संस्थेला या वर्षी ऑडिट वर्ग "अ" मिळाला असून सर्व सभासदांना संस्था 15% लाभांश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेचे सभासद श्री.ऍड. शिवाजी मदने श्री. भगवान शिंदे व श्री हरीश भोना यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व संस्था सभासदांना देत असलेल्या सेवे बद्दल कौतुक केले तसेच सभासदांना 15% लाभांश दिल्याबद्दल आभार मानले. सभेपुढील विषय वाचन संस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले संस्थेचे तेरीज ताळेबंद नफा तोटा व अंदाजपत्रक यावेळी त्यांनी सभासदांसमोर वाचून दाखवले तसेच एक ते आठ या विषय वाचून त्या वर सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सदर वार्षिक सभा आनंदी व खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली.सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेळेवर येणाऱ्या सभासदांना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे काढण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक रामचंद्र गोरे द्वितीय क्रमांक विठ्ठल कुदळे सौ.जयश्री राऊत सुरेश धाईंजे व तृतीय क्रमांक भारत राजमाने,सदाशिव राऊत सौ.स्वाती बनकर सौ.कीर्तीका राऊत मुकुंद कापसे यांना अनुक्रमे बक्षिसे लागली तसेच सर्व हजर सभासदांना एक गिफ्ट व स्वादिष्ट भोजनाची सोय यावर्षी संस्थेमार्फत करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने सभासद व पत्रकार बंधू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमृता मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश राजमाने यांनी मानले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले

0 टिप्पण्या