पंढरपुरात सकल लोहार समाजाचा अन्नत्याग सत्याग्रह सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत लढा तीव्र ठेवणार - पै. यशवंत कळसाईत
वृत्त एक सत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज / पंढरपुर प्रतिनिधी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लोहार समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर येथे तहसील कार्यालयासमोर सकल लोहार समाजाच्या वतीने दोन ऑक्टोबर पासून उपोषणकर्ते दादासाहेब कळसाईत यांच्या अन्नत्याग सत्याग्रह व आमरण उपोषण आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये गावभेट दौरे करण्यात आले होते, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून या ऐतिहासिक उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने लोहार समाज बांधव व भगिनी पंढरपूर येथे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. याबद्दल श्री विश्वकर्मा संघटना आणि गाडी लोहार समाजाच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना श्री विश्वकर्मा संघटनेचे संस्थापक तथा गाडी लोहार समाज, अकलुजचे अध्यक्ष पै. यशवंत अर्जुन कळसाईत म्हणाले की, "सर्व लोहार समाज बांधव व भगिनींनी दाखवलेली ही एकता आणि अपार समर्थन खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने पंढरपूर येथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. आपले हेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर, कळसाईत कुटुंबावर आणि संपूर्ण संघर्ष करणाऱ्या टीमवर सदैव असेच राहो, हीच प्रभू श्री विश्वकर्मा चरणी प्रार्थना करतो."लोहार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या