लोकशाहीच्या रक्षणासाठी राजघाटावर शांततापूर्ण आंदोलन!
वृत्त एकसत्ता न्यूज
नवी दिल्ली :
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज राजघाट येथे उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत त्यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी आयोजित शांततापूर्ण आंदोलनात सहभाग घेतला.
जनतेचा मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असून, मतदान प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष, पारदर्शक आणि समाधानकारक उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत लोकशाहीचे संरक्षण आणि जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली.

0 टिप्पण्या