सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाची महाड येथे औद्योगिक भेट संपन्न.

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाची महाड येथे औद्योगिक भेट संपन्न. 

वृत्त एकसत्ता न्यूज   

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/10/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ व २२ ऑक्टोंबर २०२६ रोजी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग पदवी विभागाची औद्योगिक भेट इसेस प्रायव्हेट लिमिटेड महाड, जि.रायगड या ठिकाणी भेट देण्यात आल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी दिली.  औद्योगिक भेटीच्या मुख्य उपक्रमांमध्ये कंपनीची ओळख करून घेणे, सॉफ्टवेअर विकास प्रक्रियेची माहिती मिळवणे, सॉफ्टवेअर टूल्स आणि तंत्रज्ञान समजून घेणे, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधणे, प्रत्यक्ष माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांविषयी जाणून घेणे, सांघिक कार्याचे महत्त्व समजून घेणे आणि सॉफ्टवेअर उद्योगातील करिअरच्या संधींची माहिती मिळवणे यांचा समावेश होता.

तसेच विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर उद्योग, सॉफ्टवेअर विकास प्रक्रिया आणि व्यावसायिक कार्यसंस्कृती समजून घेण्याची संधी मिळाली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोग समजण्यास मदत झाली. तसेच तांत्रिक कौशल्ये, सांघिक कार्य, संवाद कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांचे महत्त्व समजले. एकूणच, या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्राबद्दलची जागरूकता वाढली आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील करिअरसाठी तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. 

या औद्योगिक अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकविल्या जाणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक वापर समजण्यास मदत होईल. 

या औद्योगिक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात नक्कीच फायदा होईल. या औद्योगिक भेटीमध्ये अंतिम वर्ष  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग च्या  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे  मार्गदर्शन लाभले व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग  पदवी विभागाचे विभागप्रमुख प्रा.सचिन पांढरे, तसेच  प्रा.श्रुतिका कराळे, प्रा.प्रणाली जाधव व प्रा. इंद्रजीत इनामदार, आप्पासो शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या