🟢 किशोरवयीन मुलींसाठी विशेष आरोग्य व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न 🟣 आनंदीबाई गुजर ट्रस्ट व गुजर हॉस्पिटल यांचा संयुक्त सामाजिक उपक्रम

 

🟢 किशोरवयीन मुलींसाठी विशेष आरोग्य व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न 

🟣 आनंदीबाई गुजर ट्रस्ट व गुजर हॉस्पिटल यांचा संयुक्त सामाजिक उपक्रम 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 7/10/2026 :

पिंपळनेर तालुका माढा येथील श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर येथे किशोरवयीन मुलींसाठी विशेष आरोग्य व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. आनंदीबाई गुजर ट्रस्ट व गुजर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामपंचायत पिंपळनेरच्या सरपंच अनुजा संजय डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी गुजर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉ. ऋचा विवेक गुजर  यांनी  किशोरावस्थेतील बदलांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्या पुढे म्हणाल्या कि किशोरवयातील शारीरिक, मानसिक बदल आणि मासिक पाळीबाबत वैज्ञानिक व मोकळेपणाने मार्गदर्शन केले.

​“बदल हे वाढीचे लक्षण आहे; त्याची योग्य माहिती आणि काळजी हीच खरी ताकद आहे.” 

​शारीरिक बदल व वाढ: बालपणातून तारुण्याकडे पदार्पण करताना उंची, वजन, त्वचेतील बदल (मुरुम) आणि शरीराची वाढ होणे ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे.

​मासिक पाळी आणि स्वच्छता: मासिक पाळी हा लाजेचा किंवा संकोचाचा विषय नसून जैविक प्रक्रियेचा भाग आहे. पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता पाळणे, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर व विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे.

​योग्य आहार व काळजी: रक्ताल्पता (ॲनिमिया) टाळण्यासाठी पाळीच्या काळात लोहयुक्त आहार, हिरव्या पालेभाज्या, दूध आणि पुरेशा पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

​गैरसमज दूर करण्याचे आवाहन: समाज मनातील जुनाट गैरसमज बाजूला सारून मुलींनी स्वतःचा आदर करावा आणि मुलांनीही या विषयाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून विद्यार्थिनींना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

*१५० विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड्सचे वाटप

​या शिबिराचे औचित्य साधून उपक्रमांतर्गत विद्यालयातील आठवी ते दहावीच्या १५० मुलींना मोफत सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली. या प्रसंगी पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या सदस्या  अश्विनी काशीद आणि  विजया साडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

​तसेच कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी श्री गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक के. डी. शिंदे, ज्येष्ठ संचालक व प्रतिष्ठित नागरिक गुरुदेव पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

​ ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक  राजेंद्र देवकर यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून विद्यार्थिनींनीही आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या