शिवभक्त अशोक बंडाप्पा शेटे यांचे वार्धक्यातील आजाराने अकस्मात निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/10/2026 : गांधी चौक, अकलूज येथील मोठे व्यावसायिक व शिवभक्त अशोक बंडाप्पा शेटे (वय 81 वर्षे) यांचे मंगळवार दिनांक 6 /10/2026 रोजी सकाळी 11:45 वाजता राहते घरी वार्धक्यातील आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कै.अशोक बंडाप्पा शेटे यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी पाच वाजता गांधी चौक येथील राहत्या निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांचे पार्थिवावर गांधी चौक अकलूज येथील शेटे फार्म येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचे कै.अशोक बंडाप्पा शेटे हे चुलते होत.

0 टिप्पण्या