मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 4/10/2026 :

हल्ली आपण प्रत्येक जण भविष्याबद्दल अत्यंत जागरूकपणे विचार करतो. आपल्या म्हातारपणाची योग्य सोय करणे गरजेचे असल्याने तरुण वयात नोकरी-व्यवसायातून मिळवलेल्या पैशांची आपण विविध मार्गांनी गुंतवणूक करतो.

बँकेत बचत, मुदत ठेव व निरनिराळ्या योजनांमध्ये आपण पैसे गुंतवतो; नामांकित कंपन्यांचे शेअर्स घेतो, कोणी शेतजमीन खरेदी करतात, तर कोणी घरे बांधून ती भाडेतत्त्वावर देतात. काही जण सोने-चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक करतात.

मात्र या भौतिक बचतीच्या जोडीला आजच्या काळात खरी आणि शाश्वत गुंतवणूक सुसंस्कारांची करणे अधिक गरजेचे आहे. आपली मुले हीच आपले, समाजाचे आणि या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. देशाचे भावी आधारस्तंभ सुसंस्कृत व नीतीमान घडले, तरच आपली कुटुंबे, सुदृढ समाज आणि आपला देश सुस्थितीत राहील!

आजचा संकल्प

जगण्यासाठी पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे; पण आपली सुसंस्कारित मुले त्याहूनही लाखमोलाची आहेत. म्हणून आपल्या मुलांवर योग्य वयात उत्तम संस्कार करू आणि स्वतःच्या सुरक्षित म्हातारपणाची खरी सोय करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या