मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/10/2026 :

आपण नेहमी दातृत्वाबद्दल भरभरून बोलत असतो. दानशूरपणा हा एक अत्यंत महत्त्वाचा सद्गुण मानला जातो; गरजूंना काही देणे किंवा दानधर्म करणे हे श्रेष्ठ पुण्यकर्म समजले जाते.

मात्र दान करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची खरी गरज, तिची तीव्रता आणि आपण केलेल्या मदतीचा त्याच सत्कारणासाठी योग्य वापर होईल ना, याची खात्री करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोख पैसे देण्यापेक्षा ज्या वस्तूची प्रत्यक्ष गरज आहे, ती वस्तू देणे अधिक संयुक्तिक ठरते.

अनेकदा एक अडचण सांगून मदत मागितली जाते आणि ते पैसे चैनीसाठी किंवा वाईट व्यसनासाठी उडवले जातात, असाही कटू अनुभव येतो. काही वेळा धार्मिक उत्सवांसाठी गोळा केलेल्या वर्गणीचा गैरवापर कसा होतो, हे आपण सर्व जण जाणतोच.

आजचा संकल्प

समोरची व्यक्ती कारण काहीही सांगो; पण मदत करताना किंवा दानधर्म करताना त्याचा वापर योग्य कारणासाठीच होणार आहे ना, याचा सदसद्विवेकबुद्धीने विचार करू आणि केवळ सत्पात्रीच दान देऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या