विचारधारा

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 4/10/2026 :

आपल्या अंतर्मनात नेहमी सकारात्मक आणि निर्मळ विचार असतील, तर आपल्या हातून घडणारी प्रत्येक कृती सकारात्मकच घडते. आपले बोलणेही गोड आणि सकारात्मक राहते; ज्यामुळे सभोवतालच्या लोकांनाही आपल्याकडून नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते.

आपल्या बोलण्यातून आणि प्रत्यक्ष वागण्यातून नम्रता, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, आदरभाव, जिद्द, चिकाटी व कष्टाळू वृत्ती झळकत असेल, तर त्या सद्गुणांमुळे समोरच्या व्यक्तीलाही जीवनात नवी प्रेरणा मिळते.

मुलांनो, मोठ्यांची अवज्ञा करणे, उलट उत्तरे देणे किंवा अपशब्द वापरणे या गोष्टी आपल्यातील नकारात्मकता दर्शवतात. जे भाव मनात असतात, तेच शेवटी आपल्या चेहऱ्यावर उमटतात. मनात असलेला राग, संताप, चिडचिड आणि द्वेष या गोष्टी न बोलताही समोरच्याला लगेच समजतात.

मनातील विचार सदैव सकारात्मक आणि शुद्ध ठेवा; चेहऱ्यावरील भावही नेहमी सात्त्विक आणि प्रसन्न राहतील!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या