विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 2/10/2026 :

महात्मा गांधी जयंती - लाल बहादूर शास्त्री जयंती, विनम्र अभिवादन!

२ ऑक्टोबर हा मोहनदास करमचंद गांधी, म्हणजेच आपल्या बापूजींचा जन्मदिवस! लंडनमधून 'बॅरिस्टर' ही उच्च पदवी संपादन करूनही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी समर्पित केले; पुढे ते संपूर्ण विश्वात भारताचे 'राष्ट्रपिता' म्हणून आदराने ओळखले जाऊ लागले.

आज भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती! अत्यंत हलाखीच्या गरीब परिस्थितीतून ते स्वाभिमानाने मोठे झाले; अत्यंत सालस, प्रामाणिक व शांत असा त्यांचा स्वभाव होता. 'जय जवान, जय किसान' हा अजरामर नारा देऊन त्यांनी आपला अन्नदाता शेतकरी व रक्षणकर्ता सैनिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मुलांनो, शास्त्रीजी हे गांधीजींचे सच्चे अनुयायी होते; बापूंच्या तत्त्वांवर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यांनीही स्वदेशीचा आग्रह धरला आणि परदेशी वस्तू व कपड्यांची होळी केली.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी गांधीजींनी, तर स्वातंत्र्योत्तर भारताचा विकास आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शास्त्रीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या