विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/10/2026 :

"मी माझ्या वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन" हे पवित्र वाक्य आपण दररोज शाळेत राष्ट्रप्रतिज्ञा म्हणताना उच्चारतो. पण आपण दैनंदिन जीवनात खरोखरच त्याप्रमाणे वागतो का? आपल्या घरातील आई-वडील, आजी-आजोबा व इतर ज्येष्ठ मंडळींशी आपण कसे वागतो?

त्यांनी आपल्याला एखादे साधे काम सांगितले तर कोणतेही आढेवेढे न घेता, विनाविलंब आपण ते तत्परतेने करतो का? आपले वागणे चुकल्यावर त्यांनी प्रेमाने काही सूचना केल्या किंवा वळण लावण्याचा प्रयत्न केला, तर आपण चिडून उलट उत्तरे देतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारून पाहावा.

मुलांनो, घरातून मिळणारे हेच लहानसहान संस्कार आपले भावी व्यक्तिमत्त्व घडवत असतात. मोठ्या माणसांशी उर्मटपणे बोलणे, दुरुत्तरे देणे, त्यांच्यावर मोठ्या आवाजात डाफरणे किंवा त्यांनी विचारल्यावर फटकून गप्प बसणे या गोष्टी पूर्णपणे अयोग्य आहेत.

आपणच आपल्या सुसंस्कृत जीवनाचे शिल्पकार आहोत, हे सदैव ध्यानात ठेवा!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या