विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/10/2026 :
आता ऑक्टोबर महिना सुरू आहे. दुपारचे तापमान चांगलेच वाढले असून जणू कडक उन्हाळाच सुरू आहे की काय, असा भास होतो. त्यात आणखी भर म्हणजे परतीचा मान्सून पाऊस अपेक्षेप्रमाणे पडलाच नाही; परिणामी आत्तापासूनच धरणांमधील पाणीसाठा केवळ ७५ टक्क्यांवर आला आहे!
एरवी या दिवसांत नद्या दुथडी भरून वाहत असतात; मात्र यंदा आपल्या नद्या आत्ताच आटल्यासारख्या वाटत आहेत. त्यातच सणासुदीच्या दिवसांतील निर्माल्य व इतर कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असून नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे.
मुलांनो, पुढील पावसाळा सुरू व्हायला अजून तब्बल आठ महिन्यांचा मोठा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत शिल्लक राहिलेले हे पाण्याचे साठे (दूषित न करता) आपल्याला वर्षभर पुरवायचे आहेत. शेती, उद्योग, मुक्या जनावरांचा चारा-पाणी आणि आपल्या पिण्यासाठी हे पाणी अत्यंत गरजेचे असल्याने त्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला पाहिजे.
पाणी काटकसरीने वापरा, शक्य तिथे पाण्याचा पुनर्वापर करा आणि सर्वांच्या सक्रिय सहकार्याने हे जलसंकट दूर करूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या