श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ, काटा पूजन व गळीत हंगाम शुभारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/10/2026 :श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सिझन 2026-27 चा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ, काटा पूजन व गळीत हंगाम शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील व सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व काटा व बैलगाडीचे पूजन सहकार महर्षि साखर कारखान्याचे व्हा .चेअरमन शंकरराव माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सत्यनारायण पूजा ही कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे पाटील व सौ. शोभा वाघमोडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, शिवांशिका विश्वतेसिंह मोहिते पाटील, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. शिवाजीराव पिसाळ, पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर, शिवामृत दूध उत्पादक संघाचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे , माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे, राहुल बापू वाघमोडे, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब पाटील, प्रवीण वाघमोडे, मानसिंग मोहिते, अभिमान सावंत, मधुकर वाघमोडे पाटील, RPI पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ भोसले, RPI तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास ढोपे, सहकार महर्षि साखर कारखान्याचे संचालक विजयकुमार देशमुख, सुरेश बापू पाटील, तात्यासाहेब एकतपुरे, धनंजय सावंत, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक सचिन रणनवरे, भास्कर तुपे, जगन्नाथ जाधव, शरद साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तात्या पवार, लखन चव्हाण, अँड. नितीन मामा खराडे, सचिन साळुंखे, विराज निंबाळकर, चंद्रकांत शिंदे, दत्ता चव्हाण, सरपंच वीरकुमार दोशी, एकनाथ शिंदे, बाळासाहेब कदम, विष्णुपंत घाडगे, बाबासाहेब इंगळे, अनिल वाघमोडे, नारायण ताटे देशमुख, हर्षाली निंबाळकर, संदीप नरळे, विलास फडतरे, कल्याण हुलगे, माऊली सुळ, भोजराज माने, शिवराज निंबाळकर, विठ्ठल तात्या अर्जुन, बिनु पाटील, उत्तम माने, दीपक माने देशमुख, अभिषेक वाघमोडे पाटील, गोरख जानकर, विलास आद्रट, एकनाथ वाघमोडे, हनुमंत साळुंखे, राहुल दुधाळ, संतोष महामुनी, पत्रकार सुरेश शेंडे, तानाजी वाघमोडे, रामदास काळे, हनुमंत झजे, अनिकेत पवार, बाबुराव तरंगे उपस्थित होते. याप्रसंगी ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासद यांचा सन्मान चेअरमन मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे जेष्ठ सभासद यशवंत धोंडीबा दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 15 दिवसाचा पगार बोनस देण्याचे व ऊस उत्पादक सभासदांनी घातलेल्या उसाप्रमाणे प्रति टन अर्धा किलो साखर तसेच कारखान्याचे सभासदांना पाच किलो साखर सवलतीच्या दराने देण्याचे जाहीर केले. तसेच ऊस उत्पादक सभासदांना, शेतकरी यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शेतकरी सभासद , श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी संचालक, सहकार महर्षि कारखान्याचे संचालक, शिवामृत दुध उत्पादक संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद , पंचायत समितीचे सदस्य, सरपंच , उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन , व्हा चेअरमन, संचालक मंडळ , तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख , कार्यकारी संचालक अभिजित डुबल,सहकार महर्षि कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार,कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, व व्यापारी, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या