मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/10/2026 :
सध्या सकाळी वर्तमानपत्र उघडले किंवा बातम्या लावल्या, तर त्यांतील बऱ्याचशा बातम्या गुन्हेगारीबद्दल असतात. त्या गुन्ह्यांमध्ये सर्वसामान्य माणसांपासून शिक्षक, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय पुढारी, मंत्री आणि अगदी न्यायाधीशसुद्धा अडकलेले दिसतात.
ज्यांनी आदर्श भावी समाज घडवला पाहिजे असे शिक्षक, ज्यांच्याकडे संपूर्ण न्यायव्यवस्था आदराने व आशेने पाहते असे न्यायाधीश आणि जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहत असतील, तर आपला समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे हे वेगळे सांगायला नको!
अशा वेळी प्रत्येकाने स्वतःची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे. आपली महान संस्कृती, आपले कौटुंबिक संस्कार आणि आपल्या मूलभूत नैतिक जबाबदाऱ्यांचा आपण प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला नको का?
आजचा संकल्प
'भारत माझा देश आहे' असे केवळ तोंडातून म्हणून भागणार नाही; तर माझ्या देशाच्या प्रगतीसाठी मी स्वतः प्रामाणिकपणे माझे योगदान देणे हे माझे सर्वोच्च नैतिक कर्तव्य आहे, हे आपण प्रत्येक जण मनाशी पक्के लक्षात ठेवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या