हे करून पहा – सतत पायांना मुंग्या येतात?

 🩺हेल्थ मंत्रा |आरोग्य मंत्र|🩺

हे करून पहा – सतत पायांना मुंग्या येतात?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 4/10/2026 :

एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यानंतर पायात मुंग्या येतात. पाय बधिर किंवा सुन्न होतो. कित्येक वेळा पाय इतका जड पडतो की तो उचलणे अशक्य होते.

जीवनसत्त्वे, कॅल्शियमची कमतरता, अशक्तपणा, मधुमेह, मद्यपान / तंबाखूचे अतिसेवन, मूत्रपिंडाचा विकार किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे पायांना मुंग्या येतात.

वैद्यकीय तज्ञांच्या मते एकाच स्थितीत दीर्घकाळ बसू नये. भरपूर पाणी आणि आहार घ्यावा. मुंग्यांबरोबरच वेदना जाणवत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

बहुतांश जणांमध्ये जमिनीवर मांडी घालून बसल्यावर अथवा खुर्चीत पाय सोडून बसल्यावर काही काळानंतर मुंग्या यायला सुरुवात होते. काही जणांमध्ये, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये, पाय बधीर होणे, सुन्न होणे, प्रसंगी खुर्चीवर खूप वेळ बसल्याने पायाला सूज येणे अशी लक्षणेही दिसतात. शरीरात असणाऱ्या विविध कमतरता या माध्यमातून दर्शवल्या जातात. बऱ्याच वेळा सर्वसामान्यपणे जीवनसत्त्वांची कमतरता, कॅल्शियमची कमतरता तसेच अशक्तपणामुळेदेखील पायांना मुंग्या येतात. जीवनसत्त्वांची कमतरता, अनियंत्रित मधुमेह, मद्यपान आणि तंबाखूचे अतिसेवन, मूत्रपिंडाचा विकार, चुकीच्या पद्धतीने बसणे या कारणांमुळेही पायांना मुंग्या येतात.’

काय काळजी घ्याल ?

वैद्यकीय तज्ञांच्या मते

एकाच स्थितीत दीर्घकाळ बसू नये

भरपूर भरपूर पाणी आणि संतुलित आहार घ्यावा

मुंग्या येत असल्यास पायांची हालचाल करावी

पाय बधिर झाले असतील तर सावकाश पाय हलवणे पायांच्या बोटांना हातानेच मसाज करणे

मुंग्यांबरोबरच थकवा आणि वेदना जाणवत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला देणे

हल्ली हाता-पायाला मुंग्या येण्याचे प्रमाण वाढण्यामागे बदललेली जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन आणि व्यायामाचा अभाव ही काही प्रमुख कारणे आहेत. आहार सुधारणे, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींचे पालन करणे हाच यावर सर्वांत प्रभावी उपाय ठरतो. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जाणीवपूर्वक समावेश केल्यास त्याचा चांगला उपयोग होईल. असे सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले

मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. अरुण मुंडे या विषयी माहिती देताना सांगितले की,पायांना मुंग्या येणे हे मूत्रपिंडविकाराचे एक लक्षण असू शकते. ज्यांना किडनीचा त्रास आहे, त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

♻️.                               ♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या