मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 8/10/2026 :

सध्या पितृपक्ष सुरू आहे. अनेक लोक आपल्या दिवंगत पूर्वजांच्या स्मरणार्थ पितरांना जेवायला बोलावतात. ज्या तिथीला घरातील व्यक्ती निवर्तली, त्या तिथीला पितृभोजन घातले जाते. पुरणपोळ्या, विविध भाज्या, फळे, वड्या, खमंग वडे, खीर वगैरे नानाविध रुचकर पक्वान्ने केली जातात.

त्या व्यक्तीच्या पवित्र स्मरणार्थ हा विधी केला जातो. तसबिरीला नैवेद्य दाखवून हे सर्व केलेले पदार्थ आपणच जेवतो; पण पितरांना मनोभावे जेवू घातल्याचे एक आत्मिक समाधान आपल्याला मिळते.

खरे तर व्यक्ती गेल्यावर नंतर इतके सगळे मोठे सोपस्कार करण्यापेक्षा, ती व्यक्ती हयात असतानाच तिला रोज इतक्याच प्रेमाने आणि आदराने जेवू घातले, तर कितीतरी पटींनी जास्त समाधान मिळेल... आपल्यालाही आणि त्या जेवणाऱ्या व्यक्तीलाही! नंतर पंचपक्वान्नांच्या कितीही पंगती उठवल्या तरी शेवटी त्याचा काय फायदा?

आजचा संकल्प

आपल्या रूढी-परंपरेनुसार पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून कृतज्ञता जरूर व्यक्त करू; पण त्याचबरोबर आज आपल्या घरात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ मंडळींनाही तितक्याच अगत्याने, आदराने व प्रेमाने जेवू घालू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या