मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/10/2026 :
जीवनात अनेक गोष्टी आपण आधीच ठरवून ठेवतो. अगदी बालपणापासून आपण डोळ्यांत काही सुंदर स्वप्ने साठवत असतो. आपल्या काही महत्त्वाकांक्षा असतात, उच्च ध्येये असतात; इतकेच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील अगदी किरकोळ गोष्टींचेही आपण नियोजन करत असतो.
अनेकदा अगदी साध्या-साध्या गोष्टीसुद्धा आपल्या मनासारख्या घडत नाहीत; काही ना काही कारणाने त्या वेळेत जमत नाहीत. अशा वेळी आपण स्वतःवरच खूप नाराज होतो किंवा उगाच नशिबाला दोष देत बसतो.
खरे सांगायचे तर, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते. ती सुयोग्य वेळ आल्याशिवाय आपण इच्छितो तसे घडत नाही. म्हणूनच थोडा धीर धरावा लागतो, शांतपणे योग्य वेळेची वाट पाहावी लागते. आपण नेटाने प्रयत्न तर करतोच; पण प्रयत्नांच्या जोडीला थोडा संयमही दाखवावा लागतो.
आजचा संकल्प
जे मनात ठरवले ते आत्ताच्या आत्ता लगेच पूर्ण झालेच पाहिजे, असा अवाजवी हट्ट न धरता प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवू आणि मनात थोडी सबुरी बाळगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या