मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 2/10/2026 :

आज २ ऑक्टोबर! राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती! महान व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी साजरी करताना आपण त्यांच्या तसबिरींचे पूजन करतो, पुष्पहार अर्पण करतो व त्यांना आदराने अभिवादन करतो.

खरे तर केवळ प्रतिमापूजन न करता त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे, उदात्त विचारांचे आणि महान कार्याचे स्मरण करून आपण त्यांतून काहीतरी मोलाचे शिकले पाहिजे. आपण स्वतः गांधीजींच्या सत्य, अहिंसा, करुणा आणि मानवता या मूल्यांचे दैनंदिन जीवनात किती आचरण करतो?

शास्त्रीजींनी देशातील सैनिक व शेतकरी बांधवांचा स्वाभिमान जागवणारा अमर नारा दिला. पण आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांची आणि त्यांच्या मुलाबाळांची अवस्था काय आहे? सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानाला व त्याच्या परिवाराला समाजात आपण किती सन्मानाने वागवतो?

आजचा संकल्प

आपण या दोन्ही थोर राष्ट्रपुरुषांचे उदात्त विचार केवळ भाषणांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणू; त्यांचे एकात्म व समर्थ भारताचे स्वप्न साकार करून त्यांना खरी आदरांजली अर्पण करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या