मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 2/10/2026 :

जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी मदतीची गरज भासतेच. मग ती व्यक्ती कितीही मोठी अधिकारी असो किंवा अगदी राजा जरी असला, तरी कधी ना कधी अडचणीच्या काळात त्यालाही आधाराचा मदतीचा हात हवा असतो.

मात्र खरी गरज असेल तेव्हाच मदत घ्यावी; अन्यथा परावलंबित्वाची सवय जडते आणि स्वतः प्रामाणिक कष्ट करण्याची सवय मोडते. तसेच मदत करणाऱ्यानेही समोरच्याला खरोखरच मदतीची नितांत गरज आहे का, याचा सदसद्विवेकबुद्धीने विचार करूनच सत्पात्री दान दिले पाहिजे.

शासनाकडून जेव्हा जनकल्याणासाठी आर्थिक मदत जाहीर केली जाते, तेव्हा त्यात कसे गैरप्रकार होतात हे सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे मदतीच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या संधिसाधू प्रवृत्तींपासून प्रत्येकाने सदैव सावध राहिले पाहिजे.

आजचा संकल्प

आपल्याला कोणालाही काही मदत करायची असेल, तर ती केवळ निखळ मानवतेच्या भावनेतून करू; मनात कोणताही स्वार्थी हेतू न ठेवता गरजवंताची अडचण दूर करू आणि श्रेष्ठ माणुसकीधर्म पाळू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या