‼️ शांतता एक हत्यार ‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
शांतता हे सर्वात भयानक मानसिक हत्यार आहे. आरडा ओरडा करून तुम्ही फक्त स्वतःची ऊर्जा घालवता, पण शांत राहून तुम्ही समोरच्याच्या मेंदूचा ताबा घेता. डार्क सायकॉलॉजी मध्ये शांतता हे 'कन्फ्युजन' आणि 'भीती' निर्माण करण्यासाठी वापरलं जातं.
जेव्हा तुम्ही एखाद्या अपमानावर किंवा प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहता, तेव्हा समोरचा माणूस मानसिकरित्या खचायला लागतो. त्याला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटायला लागते.
तुमचं मौन समोरच्याला विचार करायला भाग पाडतं की, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय. आणि ही 'अनिश्चितता' कोणत्याही धमकी पेक्षा जास्त प्रभावी असते. स्वतःचे पत्ते कधीच उघडू नका. जो माणूस कमी बोलतो, लोक त्याच्या बद्दल जास्त तर्क वितर्क लावतात, आणि त्यातूनच एक दबदबा निर्माण होतो. तुमचं शांत राहणं ही तुमची सर्वात मोठी 'चाल' असू शकते.
संकलन,लेखन : मिलिंद पंडित,
कल्याण
🍁🍁🍁
0 टिप्पण्या