मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा अगदी अटळ असतो. आयुष्यातील वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या संघर्षांना धैर्याने सामोरे जावे लागते; कधी हा लढा कौटुंबिक पातळीवर असतो, तर कधी सामाजिक पातळीवर.

अनेकदा आपलाच आपल्या स्वतःशीच आंतरिक पातळीवर संघर्ष सुरू असतो; जणू 'मी विरुद्ध मी' माझ्यातीलच काही उणिवा किंवा स्वभावदोष मला खटकू लागतात; त्यावर मात करण्याचे माझे प्रयत्न कधी अपुरे पडतात, तेव्हा मीच स्वतःला दोष देत राहतो.

आपल्या प्रत्येकालाच जीवनात काहीतरी मोठे साध्य करायचे असते; त्यासाठी अखंड चिकाटीने आणि जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. क्वचित अपार प्रयत्नांनंतरही यश हुलकावणी देते, अशा वेळी हताश न होता प्रयत्नांचा मार्ग किंवा रणनीती बदलणे शहाणपणाचे ठरते.

आजचा संकल्प

कठीण प्रसंगांना सामोरे जाताना स्वतःच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक क्षमतांचा सर्वांगीण विकास करू; कणखर संघर्ष करून ध्येय गाठू व यश संपादन करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या