सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ‘गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन’

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ‘गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन’ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/9/2026 :

शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट संचलित सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज येथील महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा (पदविका) आणि डिग्री (पदवी) इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी   यांच्या गौरव सोहळ्या’चे आयोजन मंगळवार दिनांक २९  सप्टेंबर २०२६ रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सांस्कृतिक भवन शंकरनगर-अकलूज या ठिकाणी दुपारी ३:०० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी दिली आहे. 

शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या तांत्रिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या पदविका व पदवी अभियांत्रिकीच्या सर्व विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांचे कौतुक करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,  महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील,अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच कारखान्याचे सेक्रेटरी व महाविद्यालयाच्या ट्रस्टचे सचिव   सुहास रघुनाथ यादव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार, सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग,व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

तरी या गुणगौरव सोहळ्यास सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या