कायदा व परिस्थिती विषयक जाणीव ठेवा - ॲड. संभाजी निंबाळकर
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/9/2026 :
येथील सदाशिवराव माने विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. समाजामध्ये अराजगता माजू नये म्हणून शासनाने कायदे केलेले आहेत. यामध्ये दिवाणी आणि फौजदारी कायदे येतात. १८ वर्षानंतर कारवाईस आपण स्वतः जबाबदार रहता. वाहन चालवताना, सोशल मीडियावरील गुन्हे, सायबर क्राईम. बाल न्यायालय, सुधारगृह, मुलींविषयी कायदे, छेडछाड, पोक्सो ॲक्ट, परीक्षेतील गुन्हे अशा अनेक बाबीची माहिती माळशिरस न्यायालयातील वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष संभाजी निंबाळकर यांनी दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी आपल्या भाषणामध्ये कायदा हा केवळ न्यायालयीन प्रक्रिया, कलमे आणि नियमांचा विषय नसून समाजव्यवस्थेला न्याय, समानता आणि शिस्त प्रदान करणारे महत्त्वाचे साधन आहे. कायद्याचे ज्ञान ही केवळ पदवी मिळवण्याची साधने नसून, समाजात न्याय आणि हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. तरुण भारताचे नागरिक म्हणून जगत असताना कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. मैत्री कुणाबरोबर असावी याचेही भान ठेवा. सोशल मीडियापासून लांब रहा. आपल्यामुळे आपल्या पालकांची मन खाली जाऊ नये असे वागा. सदर कायदेविषयक व्याख्यानासाठी विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, विभागप्रमुख संजय जाधव, शिक्षक प्रतिनिधी बलभिम काकुळे याबरोबरच विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन अनुराधा निंबाळकर, आभार सुनिता सुर्वे यांनी केले.


0 टिप्पण्या