हायवेवरील हिरवा आणि निळा बोर्ड
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/9/2026 :
हायवेवरून जात असताना हिरव्या आणि निळ्या रंगांच्या बोर्डवर ठिकाण, दिशा आणि अंतर याबाबत माहिती लिहिलेली असते. ड्रायव्हरला नेमकं कुठे वळायचं आणि आपलं डेस्टिनेशन कुठे आहे तसंच आपण सध्या कुठे आहोत, याची माहिती या बोर्डवरून मिळते. फक्त बोर्डाचा रंग पाहून तो एक्सप्रेस हायवे आहे का नॅशनल हायवे आहे, का स्टेट हायवे आहे हे ठरवलं जात नाही. भारतात रस्त्यावरचे निळ्या आणि हिरव्या रंगाचे बोर्ड हे रस्त्याचा प्रकार, चिन्हांचा उद्देश आणि रस्ते प्राधिकरणाच्या मानकांच्या आधारावर निश्चित केले जातात. हायवेवर आणि रस्त्यांवर असणारे हिरवे आणि निळे साईनबोर्ड (रंगीत फलक) वेगवेगळे रस्ते आणि दिशा दर्शवण्यासाठी वापरले जातात.
*हिरवा साईनबोर्ड* लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि राष्ट्रीय/राज्य महामार्गांवर असतात. पुढचे शहर किती अंतरावर आहे आणि दिशा कोणती आहे हे दर्शवतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांना दूरवरून स्पष्ट दिसावे म्हणून हिरव्या रंगाचा वापर केला जातो. *निळा साईनबोर्ड* हे शहरातील रस्ते, नागरी रस्ते, किंवा स्थानिक मार्गांवर असतात. कुठे वळायचे आहे किंवा विशिष्ट सुविधा (उदा. हॉस्पिटल, पेट्रोल पंप, मेट्रो मार्ग) कुठे आहेत, याची माहिती देतात. कमी वेगाच्या शहरी भागात वाहनचालकांना सोयीचे जावे म्हणून हे लावलेले असतात.
शहरी भागातील रस्त्यांवरही निळ्या रंगाचे बोर्ड दिसू शकतात, त्यामुळे निळे बोर्ड फक्त एक्सप्रेस हायवेवरच असतात असं मानणं चूक ठरू शकतं. बोर्डवरची माहिती, रस्त्याची रचना आणि तिथे लावलेल्या दुसऱ्या ट्रॅफिकच्या खुणा पाहूनच रस्त्याबद्दलची माहिती मिळू शकते.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट

0 टिप्पण्या