वॉटर टाईम बॉम्ब वर वसवले गेलेले आजचे नाशिक
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/8/2026 :
एखादी सामान्य दिसणारी नदी किती प्रलयंकारी असू शकते हे नेपाळच्या दुर्घटनेमध्ये दिसून आले आणि अजूनही तो धोका टाळलेला नाही!
इथं नाशकात जिथे एक वर्षात मोठा कुंभमेळा भरणार आहे तिथं पाच नद्यांना दाबून टाकून त्यांच्यावर वस्त्या उभ्या राहिलेल्या आहेत.
जेव्हा नाशिक आणि नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये मध्ये काही एम एम जास्त पाऊस होतो त्यावेळी काय होऊ शकते हे गोदावरी आणि नंदिनी सारख्या नद्यांनी दाखवून दिलेले आहे!
गोदावरीत सामील होणाऱ्या नाशिक शहरातील मुस्कटदाबी झालेल्या नद्या खालील प्रमाणे आहेत
१) *गोदावरी* (मुख्य प्रवाही नदी)
२) *अरुणा* (गुप्त नदी)
३) *वरूणा* (गुप्त नदी)
४) *तरूणी* (पौराणिक उल्लेख असलेली गुप्त धारा)
५) *इंद्रायणी* इंद्र कुंडातून रामकुंडाकडे येणारी नदी. हिच्या सर्वपात्रावर मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांच्या खालून ही नदी सुप्त बॉम्ब सारखी वाहते. हिचा कधीही विस्फोट होऊ शकतो.
६) *कपिला* (तपोवन परिसरात गोदावरीला मिळणारी उपनदी)
वरील तीन नद्या म्हणजे अरुणा तरुणा आणि कपिला यांची उगमस्थानेच वादामध्ये आहेत आणि या नद्यांच्या पात्रांमध्ये आज पंचवटी परिसरात भरगच्च वस्त्या उभ्या आहेत. या वस्त्यांना हे देखील माहित नाही की त्यांच्या खालून पाण्याचा प्रचंड मोठा स्त्रोत वाहतो आहे आणि तो कधीही टाईम बॉम्ब लावल्यासारखा फुटू शकतो.
७) *सरस्वती* या नदीला नाला करून टाकून तिच्यावर सारडा सर्कल, भद्रकाली मार्केट, सराफ बाजार ते गंगेवरील बालाजी मंदिर एवढी सगळी बेकायदेशीर वस्ती वसवली गेली आहे आणि या वस्तीच्या खालून ही नदी टाईम बॉम्ब लावल्यासारखी वाहत आहे.
८) *व्याघ्रवती* (वाघाडी) या नदीवर म्हसरूळ ते पंचवटी एवढ्या मोठा परिसरात अगदी हातभट्ट्या दारूचे कारखाने वसवले गेलेले आहेत आणि ही नदी मुस्कटदाबी केल्यासारखी या सगळ्या भयानक वस्तीतून जमिनीखालून वाहते.
९) *नंदिनी* - (नासर्डी) सातपूर परिसरातून पंचवटी तपोवन पर्यंत येणारी ही नदी 20 किलोमीटर च्या पात्रामध्ये अगदी गटारगंगा करून सोडलेली आहे आणि तिच्या पात्रावर बेकायदेशीर बांधकामेही करून ठेवली गेलेली आहेत.
१०) *काचित* - (वालदेवी) त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी पर्वतरांगातून पुढे येणारी ही नदी पांडवलेणी, देवळाली, नाशिक रोड असा प्रवास करत पुढे गोदावरीत मिळते याही नदीवर अशीच बेकायदेशीर बांधकामे करून ठेवली गेलेली आहेत आणि गटारेही सोडलेली आहेत.
११) *लक्ष्मणा* - पंचवटी परिसरातून गोदावरीत जाणारी ही नदी जवळजवळ नष्ट करून टाकली गेलेली आहे आणि त्यावर म्हसरूळ ते मेरी हे सर्व बांधकाम उभे झालेले आहे. भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही नदी अचानक उफाळून वर आल्यास म्हसरूळ ते पंचवटी हा सर्व परिसर क्षणार्धात नष्ट होऊ शकतो!
यासारखे बावीस प्रवाह नाशिक नगरीत सुप्त अवस्थेत असून ते पुढच्या काळात वाढून ठेवलेल्या आपत्तीची वाट बघत मोठा अनर्थ घडवण्यासाठी सज्ज आहेत.
नासिक नगरीत कुंभमेळा होऊ घातलेला आहे परंतु त्याच्यात या प्रवाहांचा कोठेही विचार केला गेलेला नाही!
नाशिक मध्ये १०० मीमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास हे सर्व सुप्त प्रवाह त्यांच्या विनाशक ताकतीसह मोठा अनर्थ घडवल्याशिवाय राहणार नाहीत याची प्रशासनाला आणि नाशिककरांना सुताराम कल्पना नाही!
जर विनाशकारी आपत्ती आली तर नाशकात कमीत कमी पाच लाखापेक्षा जास्त जीवित हानी होऊ शकते याची कल्पना राज्य आणि केंद्र प्रशासनालाही नाही
नाशिक मध्ये वाहणाऱ्या मुख्य नद्यांची पौराणिक नावे खालील प्रमाणे
१) गंगा गोदावरी
२) लक्ष्मणा
३) वितस्ता
४) अस्किनी
५) परुष्णी
६) विपाशा
७) शततुद्री / शतद्रु
८) सदानिरा
९) दृषद्वती
१०) कुभा
११) कुभू
१२) गोमती
१३) सुवास्तु
१४) सरस्वती
१५) अरुणा
१६) वरूणा
१७) तरुणी
१८) इंद्रायणी
१९) कपिला
२०) व्याघ्रवती
२१) काचीत
२२) नंदिनी
वरील नद्यांपैकी किती नद्या तुम्हाला माहित आहेत हे नाशिककरांनी आपल्या हृदयावर हात ठेवून सत्य कथन करावे!
जर नाशिक मधील नैसर्गिक नद्या आणि त्यांचे प्रवाह माहित नसतील तर उगाच कुंभाच्या पोकळ थापा मारू नयेत आणि जनतेची दिशाभूल करू नये!

0 टिप्पण्या