कै. वसंत गणपत बागल यांचे 4 सप्टेंबर रोजी प्रथम वर्षश्राद्ध

 

कै. वसंत गणपत बागल यांचे 4 सप्टेंबर रोजी प्रथम वर्षश्राद्ध 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/8/2026 : बागल वस्ती, शेंडगेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील शिवभक्त कै. वसंत गणपत बागल यांचे प्रथम वर्षश्राद्ध शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी आहे. त्यानिमित्त सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत  फुलाचे  किर्तन  आयोजित करण्यात आले आहे. बागल वस्ती शेंडगेवाडी येथील त्यांचे निवासस्थाना जवळील श्री सोमेश्वर मंदिर प्रांगणात किर्तनकार ह.भ.प. हनुमंत महाराज निकम (तोंडले) यांची किर्तन सेवा होईल. तरी सर्वांनी वर्षश्राद्धनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बागल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या