विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
आपल्या शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण अविरत प्रयत्न करत असतो. नियमित लेखन, वाचन, मनन, चिंतन आणि पाठांतर अशी अभ्यासाची पूर्वतयारी अखंड सुरू असते. जोडीला अवांतर वाचन, वक्तृत्व, निबंध आणि विविध क्रीडा स्पर्धांचे मोठे दालन खुले असतेच.
या सर्व व्यापांमधून सवड काढून घरातील माणसांना, नातलगांना आणि मित्र-मैत्रिणींनाही वेळ द्यावा लागतो; आपले वैयक्तिक छंद व कलागुणांची आवड जपायची असते. थोडक्यात काय तर, विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा अत्यंत समृद्ध पण धावपळीचा काळ असतो!
मुलांनो, याच शालेय वयात आपल्या भावी आयुष्याची मजबूत पायाभरणी होत असते. शिक्षण पूर्ण झाले की नोकरी, तिथली व्यावसायिक आव्हाने आणि घरप्रपंच यात माणूस पूर्णपणे व्यस्त होऊन जातो. वय वाढते तशा जबाबदाऱ्याही वाढत जातात आणि त्या आनंदाने पेलायच्या असतात.
शालेय वयातच वेळेचे अनमोल महत्त्व आणि योग्य नियोजन ज्याला समजले, त्याला भविष्यात कधीही अडचणी येत नाहीत!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या