शिवामृत दूध संघाच्या ५० TPD क्षमतेच्या कंडेन्स्ड मिल्क प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ


शिवामृत दूध  संघाच्या ५० TPD क्षमतेच्या कंडेन्स्ड मिल्क प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/8/2026 :

शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या ५० TPD क्षमतेच्या कंडेन्स्ड मिल्क प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ  विजयनगर-अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर राकेश सुमन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये कंडेन्स्ड मिल्कला मोठी मागणी आहे. या वाढत्या बाजारपेठेचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला अधिक मूल्य मिळावे, त्यांचे उत्पन्न स्थिर व्हावे आणि भविष्यातील बाजारपेठेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघामार्फत ५० टीपीडी क्षमतेचा कंडेन्स्ड मिल्क प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे संघाचे चेअरमन तथा खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.



यावेळी संघाचे मार्गदर्शक राजसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक मनीषकुमार सिन्हा, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शितलदेव मोहिते पाटील,स्वरूपाराणी मोहिते-पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, नगरसेवक आणि दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या