🍀 रानभाजी - टेटवा ची शेंग 🍀
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/8/2026 :
टेटवा (खरशिंग) ची शेंग ही पावसाळ्यात रानात मिळणारी एक औषधी व चवदार रानभाजी आहे. याचे शास्त्रीय नाव 'ओरॉक्सिलम इंडिकम' असून इंग्रजीत याला 'ब्रोकन बोन ट्री' किंवा 'इंडियन ट्रम्पेट फ्लॉवर' म्हणतात. हि भाजी विशेष करून कोकणात आढळून येते.
कोवळ्या शेंगांचे तुकडे करून किंवा उकडून भाजी व आमटी बनवतात. याच्या शेंगांचे आंब्या प्रमाणे लोणचे किंवा खारात जतन केलेले तुकडे तोंडाला चव आणतात. सालीस आणि बियांच्या पावडरचा वापर स्नायूंच्या बळकटीसाठी व आयुर्वेदात विविध रोगांवर केला जातो. हे झाड माती घट्ट धरून ठेवते व जमीन सुपीक करण्यास मदत करते.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट

0 टिप्पण्या