सहकार महर्षि अभियांत्रिकीतील ए.आय.एम.एल.पदविका विभागाची "सहकार महर्षि" साखर कारखान्यास भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/8/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदविका आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागाची औद्योगिक भेट सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगर या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
या औद्योगिक भेटीदरम्यान सहकार महर्षि साखर कारखान्याला भेट देणे अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरले 'शुगर ईआरपी' हे साखरेच्या कारखान्यासाठी वापरले जाणारे डेटाबेस व्यवस्थापन सॉफ्टवेअर (ओरॅकल-आधारित) आहे. यामध्ये ऊस नोंदणी आणि शेतकऱ्यांकडून ऊस स्वीकारण्यापासून ते साखर उत्पादनापर्यंतच्या साखर उद्योगातील सर्व प्रक्रियांचा समावेश होतो. यात शेतकरी (सभासद किंवा बिगर-सभासद), क्षेत्राची माहिती, शेतजमिनीचा तपशील, ऊस तोडणी व वाहतूक, शेअर्स, ठेवी, साखरेचे प्रमाण व गुणवत्ता तसेच ऊसाचे बिलिंग इत्यादी माहिती समाविष्ट असते. दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेले विविध अहवाल आणि एम. आय. एस. अहवाल (ऊस नोंदणीपासून ते आर्थिक विवरणपत्रांपर्यंत) यात मिळतात; थोडक्यात सांगायचे तर, हे सॉफ्टवेअर संस्थेच्या सर्व प्रमुख कार्यांचे सुरळीतपणे व्यवस्थापन करते.थेट प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना खालील आर.डी.बि.एम.एस. संकल्पना समजण्यास मदत झाली डी.एम.एल. कमांड्स – रेकॉर्ड्स इन्सर्ट , अपडेट आणि डिलीट करणे.विविध प्रकारचे 'कीज'– प्रायमरी की , फॉरेन की, इंडेक्सिंग,ट्रिगर्स इत्यादी. कम्प्युटर उपकरणांची देखभाल तसेच औद्योगिक सुरक्षितता नियमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उद्योगातील शिस्तबद्ध कामकाज, सुरक्षिततेचे महत्त्व व व्यावसायिक याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.या औद्योगिक अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकविल्या जाणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक वापर समजण्यास मदत होईल. हा अभ्यासदौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच न्यू टेक्नॉलॉजी या व्यावसायिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.
प्रत्येक यंत्रणा आणि त्यांची कार्यप्रणाली याबद्दलच्या शिक्षकांच्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकता आले. विविध उपकरणे त्यांची सुरक्षा प्रणाली आणि त्यांच्या वापराचे महत्त्व समजून घेतल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची खरी क्षमता कशी आहे हे कळाले. या औद्योगिक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात नक्कीच फायदा होईल. या औद्योगिक भेटीमध्ये द्वितीय वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले व डिप्लोमा ए.आय.एम.एल.पदविका विभागाचे विभागप्रमुख प्रा.शेख व्ही.एम., प्रा.यादव एस. एस. व प्रा. संस्कृती कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

0 टिप्पण्या